top of page

Everyone lives with their own bunch of baggage on their shoulders.We are habitual of adding to it but do we really take efforts to reduce it? Sadhakas attending Premgandha Meditation Camps have experienced amazing changes in their mental state in just 3 days. They find themselves to be  80 to 100% free of their negative thoughts. Many people agreed that they have experienced a drastic positive change in their perspective and mental state after the camp.  Here we have some experiences...

Vaishnavi Rasam

 

Hello everyone , myself Vaishnavi Anand Rasam. I attended Premgandha Meditation Camp dated 18 , 19 , 20 September 2021. As Chetan Bhagat wrote 3 mistakes of my life , if I had to write a book I would name it 3 beautiful days of my life.

Let me start from the beginning. I came to Pune a month ago and have been living at my aunt's place. Her house is full of Premgandha vibes. A picture of Gurudev Shri Jain sir on one wall and a picture of Maa Videhi ji on the other. It's not only the pictures , I observed that she dedicates maximum time of her day thinking and speaking about Premgandha. She insisted me to attend the camp once and I agreed instantly because I believe in whatever she believes. Now you must be wondering who this aunt of mine is. She's none other than Maa Pramodini. And this is how I ended up at Premgandha camp.

So on the first day I was kind of excited and curious about what I am going to learn. Little did I know that this was less about learning and more about experiencing. Honestly speaking on the first day I was a little frustrated due to all the breathing exercises and sitting all day. I am a sportsperson so I am not used to sitting in one place for a long time. The day went adjusting myself to the environment and then there was the only session I was told about beforehand , that is the Dance session. Me and Poorna danced our hearts out and that's when I started having fun. Again , little did I know that this was just the beginning. Then after dinner we all gathered again in the hall for discussion session. In this session sir cleared our doubts with his immense knowledge and holistic approach. .

The second day started early in the morning with zumba and jap. I loved the vibrations that jap sadhna produced in my body. Then Poorna came to me and said , "Vaishnavi didi the next sadhna is my favourite one. Do it properly". Immediately after that kaki also adviced me to breath with full force and focus. This was pure indication of something important. It was the Urja Sadhana. So I just sat with determination and decided to be the last person in the room to stop the deep breathing. The first few minutes went in focusing on the breath , listening to other people's pace of breathing and adjusting my pace accordingly. But later on I felt like Maa Videhi ji was specifically asking me to breath deeper. So I started applying more and more force. After some time I felt someone's hand over my head. I felt waves emitting through it. The energy was circulating furiously and randomly inside my body. After a while I opened my eyes and found everyone in Shavasan. I found my body perspirating and my skin really cold. It was one hell of a experience I must say. Can't really describe it all in words but that whole day went in processing what I had experienced.

Other sadhanas were also effective but Urja Strot Sadhana was like an out of the world experience for me. On the third day I got the opportunity to have a word with sir. He paved my path with his beautiful advice. This one camp not only added another beautiful set of memories to my favourites list but also gave me an extended family. I am thankful and really greatful to be a part of it. Thank you.

Mandar Chincholikar


साधना करताना येणारा अनुभव शब्दांत मांडणे हे तसे अवघड काम आहे. तसा मी रोज साधना करण्यातील नव्हतो. केवळ शनिवार - रविवार या दिवशी सकाळी आणि गुरुवारी असणारी संध्याकाळची साधना सौ. सारिका ताईंच्या मार्गदर्शनाखाली होत होती. पण या कोरोना संकटामुळे मिळालेली सक्तीची सुट्टी साधना करणेसाठी संधी घेऊन आली आणि मला या साधना मार्गावर अधिकाधिक गोडी निर्माण झाली.

आता जेंव्हा मी 'प्रार्थना' म्हणतो तेंव्हा त्यातील प्रत्येक शब्द न शब्द मला माझ्या मनातील प्रश्नांची उत्तरे देऊन जातो. साधना "कशी" आणि "का" करायची याचे उत्तर प्रार्थनेच्या सुरवातीलाच मिळून जाते.

" डोळे मिटुनी अंतर्मुख होऊ
ज्योत अंतरीची पाहू "

गुरुदेवांनी साधनेसाठी वेगवेगळे मार्ग / श्वसनाचे प्रकार सांगितले आहेत. डोळे मिटून केलेली प्रत्येक साधना ही आपल्याला अंतर्मुख करतेच.अंतर्मुख होणे म्हणजे तरी काय ? आपल्या सभोवतालच्या भौतिकतेचा विसर पडून मन विचार शून्य अवस्थेत जाणे हेच नाही का ? हाच तर मार्ग गुरुदेवांनी दाखविला आहे. याच साधनेचे 'साध्य' म्हणजे आलेली अनुभूती. आपल्या अंतरीची ज्योत आपल्याला पाहता येणे हे अंतिम साध्य साधता येण्यासाठी गुरुकृपा सर्वांवर व्हावी हीच प्रार्थना.

आज या धकाधकीच्या जीवनात विचारशून्य जगणे तसे कठीणच काम आहे नाही अशक्यच आहे. गुरुदेवही म्हणतातच की आपली व्यवहारिक कर्तव्य ही आपल्याला पार पाडावीच लागतात. ती सोडून केवळ साधना मार्ग धरणे योग्य नाही. पण आता या साधनेची गोडी निर्माण झाली आहे. दररोज न चुकता साधना होते ही गुरुकृपाच आहे. कधी साधना छान होते कधी नाही होत पण आज त्यात सातत्य आहे ही समाधानाची बाब आहे. मग त्यातून काय अनुभूती मिळाली असा प्रश्न कोणी विचारला तर मी प्रार्थनेतील हीच ओळ आठवतो ...

" चैतन्यमय सारे होवो
  मग आनंदाची अनुभूती "

डोळे मिटून मिळणारी शांतता जी मनाला आनंद देऊन जाते ती एक अनुभूतीच नाही का ?
शरीरात जाणवणारा नवा उत्साह नवे चैतन्य जे समाधान देऊन जाते तीही एक अनुभूतीच नाही का ?
साधनेमुळे शरीराला येणाऱ्या मुंग्या, बधीरता किंवा जाणवणारी ऊर्जा तुम्हाला ज्या वेगळेपणाचा अनुभव करून देते तीच तर अनुभूती नाही का ?

म्हणूनच मी सुरवातीला म्हणालो की हे शब्दात सांगणे खरच खूप कठीण आहे.

"मी दररोज साधना करतो " हे सांगणे सुद्धा आज मला चुकीचे वाटत आहे. " गुरुदेव माझ्याकडून करवून घेतात " हा समर्पण भाव माझ्या मनात येवो हीच गुरुचरणी मी मनोकामना करतो.


 

Rajita Mahajan



भोरगिरी येथील शिबिरात मी प्रथमच सारिका ताईंच्या प्रेमळ आग्रहनुसार आले. पण तेथील अनुभव हा सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभूती घेऊनच आनंद व्यक्त करता येतो.
  प्रत्येक साधना छान झाल्या.
पण मी पाण्यातली जी साधना , गुरुदेवांच्यामुळे व त्यांनी दिलेल्या आशीर्वादा मुळेच करू शकले.
कारण एकतर मला पाण्याची भीती आहे व मला अजिबात पोहता येत नाही हे सांगूनही कोणाला ; माझ्या घरच्यांनाही; खरे वाटणार नाही पण हा माझा अनुभव मी वर्णनच करू शकणार नाही.  पण मी हा अनुभव जवळ जवळ २० मिनिटे पाण्यावर तरंगून घेतला. ही अनुभूती मला वेगळेच काही सांगून गेली. माझा माझ्यावरच विश्वास बसत नाही.  मी एवढे कसे करू शकले. धन्य गुरुदेव, तुमची   अगाध साधना !!!
  दुसरी साधना जी श्वासावरची. त्यातही आपण अशा अवस्थेत जातो की आपला मेंदु बधिर होतो व सर्व विचार त्यातून बाहेर पडतात व ते अश्रूवाटे निघून जातात, आपल्या मनातले विचार हे आपण ओक्सबोक्शी रडून काढून टाकतो.

अप्रतिम अनुभव सांगताच येणार नाही...

Anna Darade

धन्य आज दिन संत दर्शनाचा
अनंत जन्माचा क्षीण गेला

मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे
कदा न सोडावे चरण त्याचे

विविध तापाची झाली बोळवण
देखिलें चरण वैष्णवांचे

एका जनार्दनीं घडो त्यांचा संग
न व्हावा वियोग जन्मोजन्मी

या संत एकनाथ महाराजांच्या अभंगानंतर अजून काही वेगळं बोलावं असं अजिबात वाटत नाही..  तरीही माझा शब्दप्रपंच आपल्या समोर ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय.

मी आयुष्यात काय कमावलं आणि काय गमावलं याची गोळाबेरीज केली. आयुष्याचे 30 वर्ष मी गमावले...पण शिबरीरामध्ये माझं  पुढील आयुष्य कसे जगावं हे अवघ्या तीन दिवसात शिकलो.   

त्या तीन दिवसाबद्दल, तीन दिवसात आलेल्या अनुभवाबद्दल शब्दात वर्णन करणं महाकठीण काम आहे, त्यासाठी माझे शब्द निश्चित अपुरे पडतील..

भोरगिरीला पोहचे पर्यन्त मनात असंख्य विचारानी काहूर माजलेल होत.. मोबाईल पासून, रोजच्या कामापासून व्यसनापासून मी झोपे व्यतिरिक्त कधीच अलिप्त जगलो नव्हतो.. त्यामुळे डोकं जड पडलं होतं. मनावर दडपण होतं.  दडपण म्हणण्यापेक्षा डोक्यावर एक हजार किलोच ओझं होतं म्हणालो तर वावग ठरणार नाही..
या अश्या अवस्थेत मी शिबरीरामध्ये पोहचलो फ्रेश होऊन कपडे बदलून साधना वर्गात गेलो..
साधना सुरू झाली पण डोक्यातील विचार थांबायचं नाव घेत नव्हते..
मिक्सर मध्ये आपण वाटण करत असताना जर त्यात एखादा गारगोटी चा खडा पडावा आणि तो मिक्सर च्या भांड्यात कर्कश पणे घरघरत रहावा अशीच अवस्था माझ्या मनाची झाली होती..
पण हळू हळू मन एकाग्र व्हायला लागलं, विचार गळून पडू लागले.. मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण होऊ लागल्या आणि पूर्ण जग विसरून मी शिबिरात एकरूप झालो..
प्रसन्न वातावरण, प्रेमाने आपुलकीने वागणारे सर्व साधक बाबांच्या बोलण्यातून मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची मिळालेली उत्तर.. त्यामधून जीवनाकडे स्पष्टपणे पाहण्याचा बदलत असलेला दृष्टीकोन.. हे सर्व काही स्वर्गसुख होतं.. शेवटच्या क्षणापर्यंत वाटतं राहिलं अजून थांबावं इथंच आणि घरी आलो तरी आता परत शिबिरात येण्याची ओढ लागून राहिली आहे..
ते जगणं परत परत जगावं, तो परमोच्च आनंद परत परत घ्यावा असं सतत वाटत आहे..

आता पुढच्या शिबिराची म्हणजे 6 ऑगस्ट  ओढ मला लागली आहे. आणि माझ्या मनात तुकोबांचा हा अभंग सतत चाल धरू लागाला आहे..

भेटी लागे जिवा लागलीसे आस
पाहे रात्र दिवस वाट तुझी

पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन
तैसे माझे मन वाट पाहे

दिवाळीच्या मूळा लेकी असावली
पहातसे वाट पंढरीची

भुकेलिया बाळ अति शोक करी
वाट पाहे परी माऊलीची

तुका म्हणे मज लागलीसे भूक
धाऊनी श्रीमुख दावी देवा

ध्यान साधनेचा मार्ग दाखवल्या बद्दल केशवदादा यांचा तसेच बाबा, माँ, ताई, सर्व साधक माता, बंधू भगिनी यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे.. परंतु आभारी आहे  म्हणून आपल्या  ऋणातून मुक्त होणं मला उचित वाटतं नाही.. तर आयुष्यभर आपल्या सर्वांच्या ऋणात राहणेच पसंत करेन..

Anagha Joshi

दि.19,20,21 ऑगस्ट असे तीन दिवसीय प्रेमगंध ध्यान शिबीरात मी सहभागी झाले होते.  ह्या शिबिरामध्ये मला एका स्थानिक मैत्रिणीकडून कळलं होतं.  ह्याबद्दलची अधिक माहिती सांग म्हंटल्यावर तिने मला तीन दिवसीय वर्ग कर सुचवलं.  

तसं पाहू गेलं तर या आधी मी ब-याच गोष्टी केल्या आहेत जसं ओंकारसाधना, ब्रह्मविद्या, हार्टफुलनेस मेडीटेशन, असल्या गोष्टी केल्या आहेत.  त्याचे फायदे पटले तेव्हाच मी ते केलं.  त्याच विचाराने मी ह्या शिबिरात यायचं ठरवलं.  

प्रेमगंध मेडीटेशन - चर्चा नाही तर अनुभूती घेण्याचा विषय आहे हे वाचल्यावर ठरवलं करून तर बघूया.  श्वासावर आधारीत साधना करून ध्यान करणं आणि त्यातून निरोगी होणं ही संकल्पना  मला आवडली.  प्रत्येक सजीव श्वास घेत असतो आणि प्रत्येकाला आरोग्यविषयक काही ना काही अडचणी असतातच.  

योग्य श्वसनप्रकार करून शरीरातील प्रत्येक पेशी उर्जेने भरून टाकायची, त्याची अनुभूती ध्यानातून घ्यायची हे या वर्गात मी शिकले. या आधी जी काही/ज्या काही ध्यान पद्धती बघितल्या होत्या, समजून घेतल्या होत्या त्या ध्यान पद्धतीने ध्यान करताना आपण काही विशिष्ट कल्पना करून, विशिष्ट दृष्य नजरेसमोर आणून, विशिष्ट सूचना मनात म्हणत किंवा विशिष्ट संगीत ऐकत ध्यान करत असतो.  पण प्रेमगंध ध्यान या सर्वांपेक्षा मला वेगळं वाटलं कारण इथे व्यक्तिसापेक्ष ध्यानावस्था होती.

केवळ श्वासाची साधनाच नाही तर ॐ नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जयराम जयजय राम, ॐ नमः शिवाय यांचा सामुहिक जप, विशिष्ट मुळाक्षरं विशिष्ट  पद्धतीत उच्च स्वरात म्हणणं यामुळेही ध्यान साध्य होत होतं.  आणि हे ध्यानानुभव फार सुंदर होते माझ्यासाठी.  

मनाची पाटी कोरी नव्हती माझी.  मनात कुठेतरी शंका नक्कीच होती.  अध्यात्मिक फायदे पण होतात म्हणजे आता काय उपासना सांगतील? ती आपल्याला झेपण्यासारखी असेल का? माझे सद्गुरू तर श्री.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत.  त्यांच्याव्यतिरीक्त मी सद्गुरू म्हणून नाही कोणाला बघू शकत हे विचार, ही मानसिकता होती माझी.   आणि मला या बाबतीत कोणतीही तडजोड प्रेमगंध मेडीटेशन करताना करावी लागली नाही.  उलटपक्षी जी शिकवण माझ्या सद्गुरुंची आहे तीच इथेही दिली जातेय हे माझ्या लक्षात आलं.  त्यामुळे ध्यानावस्था निःशंक साधता आली.

शिबिरात आलेल्या व्यक्तींच्या आरोग्यविषयक तक्रारी ऐकून त्यांना औषधं इथे दिली जात होती.  काही त्रास होत नाहीये ना हे आवर्जून विचारलं जात होतं.  काही दुखत असेल तर अॅक्युप्रेशर, मसाज याची सेवा स्वयंसेवक अत्यंत प्रेमाने देत होते.

या शिबिरातली निवास व्यवस्था साधी, स्वच्छ होती.  आणि भोजनही सात्विक, रुचकर होते.  स्वतःचा चहाचा कप, नाश्ता, जेवणाचे ताट, चमचा स्वतः घासून पुसून जाग्यावर ठेवण्याची शिस्त आवडली. जितकं शक्य होईल तितकं मौन पाळावं हे प्रेमगंध परिवाराच्या बाबांचे, माँ चे आणि स्वयंसेवकांचे सांगणे होते.  ते मी थोड्या प्रमाणात का होईना पाळू शकले.    

मला तर खूप छान वाटलंच पण इतर शिबिरार्थींचे अनुभव ऐकताना खरोखर थक्क झाले.  साधना सातत्याने करणाऱ्या आणि शिबिरात वारंवार सहभागी होणाऱ्या  साधकांच्या डायबिटीस, संधिवात, थायराॅईड सारख्या व्याधी आटोक्यात आल्या.  काहींची औषधं कमी झाली.  काहींची बंदही झाली.  अस्थमा, ऍसिडिटी, कॅन्सर, फुफुस्साचे रोग यातही या श्वसनप्रकारामुळे आणि ध्यानामुळे  खूप आराम मिळाला हे शिबिरार्थी साधकांनी सांगितलं.  

आदरणीय बाबा आणि माँची शिकवण्याची तळमळ विलक्षण आहे.  त्यांना तेवढ्याच ताकदीने प्रेमगंधचे स्वयंसेवक मदत करतात हे खरोखर कौतुकास्पद आहे.  शिबिरार्थी कोणत्याही वयाचा असला तरी आई जसं मुलाला सांभाळते, चुचकारून शिकवत असते तेच इथं होतं.  आणि अभ्यास झाल्यानंतर करा आता मज्जा, पळा खेळायला हे जसं आई सांगते तसं इथेही संगीतावर नाच करा, झुम्बा करायला सांगतात.  

लहान मुलामुलींसाठीही प्रेमगंध ध्यान शिबिरं आयोजित करून प्रेमगंध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे महत्कार्यही करत आहे.  

साधनेत सातत्य राखल्यास अध्यात्मिक तसंच शारीरिक, मानसिक उन्नती शक्य आहे

Prakash Patil

I am sharing my spiritual experience of Premgandha Meditation.
I, Prakash Patil am a Civil engineer. I work at a senior position in my field. I communicate with skilled as well as unskilled labours. I work with a stressful and hectic schedule daily. I return home after losing all my potential energy and with all the work load on me.
I attended the Premgandha Meditation 3 days camp, almost 2 years ago. I attended every camp possible which helped me improve, both my physical and mental health. Under the guidance of Gurudev and Ma videhiji, I started doing meditation for an hour every morning. After this new routine, I experienced the change in me and my life, day by day.
The best improvement is that I learnt to be happy in every moment. I have this charming glow on my face and I have learnt to smile even in the worst situations. I have learnt to solve my problems on my own, without any help or stress. I am now a lot more confident than before in my daily activities. I feel medically fit and fine every time. One more important thing is that I have learnt to control my anger. I also have successfully kept my family healthy and happy.
I wish to stay connected to Premgandha Family.

bottom of page